dr.satish best web design developer for mac

हलकर्णी ग्रामपंचायत :

कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील पूर्वेस कर्नाटक सिमालगत हलकर्णी हे गाव वसले आहे. गडहिंग्लज तालुक्यातील  हलकर्णी गाव पोट तालुका म्हणुन ओळखले जाते. गावात आठवडा बाजार बुधवारी भरला जातो.येथे पारंपारिक तसेच आधुनिक युगाचा छानसा समतोल पाहावयास मिळतो. गावचे वैशिष्‍ट म्‍हणजे गावाला लाभलेला निसर्ग, लोकांचे राहणीमान व उच्‍च शैक्षणिक स्‍तर अशी अनेक वैशिष्‍टे आहेत. गावातील उच्‍च शिक्षणामुळे गावातील प्रगतीचा दर वाढत चालला आहे.हलकर्णी हे गाव गडहिंग्‍लज पासुन 22 कि.मी अंतरावर आहे. तसेच गावास येण्‍या-जाण्‍यास वाहतुकीच्‍या मुबलक सुविधा उपलब्‍ध आहेत.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

हलकर्णी ग्रामपंचायत ही सन 12-10-1952 पासून कार्यरत असून सदस्य संख्या तेरा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.आमच्या गावातील कुटुंबांची संख्या1,326 असून गावाची लोकसंख्या 5,953इतकी आहे.एकूण घरांची संख्या 1,650 असून ती 5 वॅार्ड मध्ये  विभागली गेली आहेत.

सरपंच
सौ. सुमन पुंडलिक भोसले

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
सौ.विलासमती अणाप्पा शेरवी

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. एन.अे. कोंडुसकर

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Halkarni Grampanchayat
A/p Halkarni Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416506

CONTACTS
Phone : 9503771733

Office : 02327 – 264110