dr.satish drag and drop website developer

आमचं गाव :

आमच्या गावची लोकसंख्या 5,953 इतकी आहे. सदर गांव ‘निर्मल ग्राम योजना’ करणेसाठी सर्वातोपरी प्रयत्न चालु आहेत. त्याचबरोबर आमदार / खासदार फंडातुन विविध विकास कामे चालु आहेत. गावात केंद्र शाळा उर्दु विद्या मंदिर हायस्कुल , ज्युनियर काॅलेज खाजगी प्राथमिक शाळा सुरु आहेत. तसेच गावात प्राथमिक आरोग्य केद्र ,जनावरांचा दवाखाना, खाजगी दवाखाने आहेत. गावात वृक्ष लागवड केली असुन सध्या 3,500 झाडे आहेत. स्मशानभुमी, वीज कंपनी, शेतकरी शाळा, काॅलेज येथे स्थापन केली आहेत. महत्वाचे म्हणजे गावात तपकीर कारखाना असुन येथील तपकीर कोल्हापुर जिल्ह्यात प्रसिध्द आहे. आमच्या गावाला ‘तपकीर गाव’ असे संबोधले जाते. गावात आठवडा बाजार बुधवारी भरला जातो. बाजारासाठी संकेश्वर, यमकनमर्डी, खानापुर येथुन व्यापारी येतात. सदर बाजार करणेसाठी हलकर्णी गावाच्या आसपासातील नागरिक येतात. गांवी किरकोळ मोठे असे एकुण 20 दुकाने, 10 हाँटेल व 5  गिरणी  आहेत.

कृषी आणि गाव :

हलकर्णी गावातील प्रमुख व्‍यवसाय शेती हा असून, येथे बागायत तसेच जिरायती पाण्‍याच्‍या पावसावर अवलंबून असणारी शेती आहे. गावातील काही लोकांनी विहिरी व बोअरवेल खोदून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा केला आहे. गावातील प्रमुख पिक हे ऊस तसेच सोयाबिन आहे. तसेच या पिकांच्‍याबरोबर भात,भुईमुग यासारखी पिके घेतली जातात. गावातील बागायती कृषी क्षेत्र हे 74 हेक्टर 21 गुंठे इतके असून, जिरायती कृषी क्षेत्र 530 हेक्टर 66 गुंठे इतके आहे. गावामध्‍ये पारंपारिक तसेचे आधुनिक पध्‍दतीचा अवलंब करून शेती केली जाते. गावामध्‍ये मोठे तसेच लहान शेतकरी आहेत. गावातील लोक शेतीला जोडधंदा म्‍हणून दुग्‍धव्‍यवसाय देखील करतात.

गावातील मंदिरे :

 मौजे हलकर्णी गावी श्री. रामलिंग देवालयाचे भव्य मंदीर आहे. हे या गावाचे ग्रामदैवतआहे. त्याचबरोबर गावामध्ये हनुमान मंदिर, यल्लमा मंदिर, पिरमाँसाबी मंदिर, दत्त मंदिर, गणेश मंदिर, श्री. मलिकार्जुन मंदिर, पिर नालसाब मंदिर ही देवस्थाने आहेत सर्व देवांची यात्रा मोठ्या उत्साहात होते. तसेच 8 कि.मी. अंतरावर किल्ले सामानगड पर्यटन स्थळ आहे. गावात सामाजिक एकी विविध कार्यक्रमातून दिसुन येते गावामध्ये विविध सण, उत्सव, यात्रा साजरे केले जातात.

ADDRESS
Halkarni Grampanchayat
A/p Halkarni Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone : 9503771733
Office :02327 – 264110