dr.satish responsive layout developer

गावातील विविध सुविधा

शैक्षणिक सुविधा :

हलकर्णी गावात एकूण आठ अंगणवाडी व एक बालवाडी आहे. तसेच तीन प्राथमिक शाळा व एक माध्यमिक शाळा आहे.. गावात उच्च माध्यमिक शिक्षण घेण्याची सोय गावातच उपलब्ध आहे. त्यामुळे गावातील मुलांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावेलागत नाही. गावातील शिक्षणाची सोय अतिशय उत्तम आहे. गावातील शाळा खूप मोठी आहे. शाळेतील शिक्षक हे तज्ञ व अनुभवी आहेत. शाळेत नवनवीन उपक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे शाळेचे विद्यार्थी हे हुशार आहेत. व सगळ्या उपक्रमात उत्साहाने भाग घेतात. गावात केंद्र शाळा उर्दु विद्या मंदिर हायस्कुल, ज्युनियर काॅलेज खाजगी प्राथमिक शाळा सुरु आहेत.

दुध संस्था :

गावामध्ये कृषीपुरक जोडधंद्यांमध्ये दुग्धउत्पादन हा व्यवसाय असून गावामध्ये पाच दुध संस्था आहेत. गावची लोकसंख्या जास्त असल्यामुळे गावात पाच दुध संस्था आहेत.

दूध संस्था व त्यांची नावे -
 • कामधेनु दुध डेअरी हलकर्णी
 • हनुमान दुध डेअरी हलकर्णी
 • गोपाळकृष्ण दुध डेअरी हलकर्णी
 • अन्नदाता दुध डेअरी हलकर्णी
 • रामलिंग सैनिक दुध डेअरी हलकर्णी

आरोग्य सुविधा :

हलकर्णी गाव हे आकाराने मोठे असल्यामुळे तसेच गावची लोकसंख्या जास्त असल्यामुळे गावात एक सरकारी प्राथमिक रुग्णालय आहे. त्यामुळे गावातील लोकांना प्राथमिक उपचार घेण्यासाठी बाहेर जावे लागत नाही. त्याचबरोबर गावात एकूण आठ खाजगी दवाखाने आहेत.

महिला बचत गट :

महिलांचा आर्थिक व सामिजिक विकास करण्यासाठी गावामध्ये पाच महिला बचत गट निर्माण केले असून त्यामार्फत महिलांचे सबलीकरण होत आहे. अनेक कुटुंबांना महिला बचत गटाचा आधार ठरत आहे. या बचत गटाच्या माध्यमातून महिला लघु उद्योग चालू करत आहेत.

महिला बचत गट व त्यांची नावे -
 • मुक्ताई महिला बचत गट
 • रमाबाई महिला बचत गट
 • बेवीरुक्या महिला बचत गट
 • अष्टविनायक महिला बचत गट
 • संतोषीमाता महिला बचत गट

तरूण मंडळे :

तरुणांच्या शक्तीचा गावाच्या विकासासाठी उपयोग करुन घेण्यासाठी तरुण मंडळे स्थापन केली आहेत यांमार्फत विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा आयोजित केल्या जातात

तरूण मंडळ व त्यांची नावे -
 • शिवशक्ती तरुण मंडळ हलकर्णी
 • राघेवेंद्र तरुण मंडळ हलकर्णी
 • जबरदस्त तरुण मंडळ हलकर्णी
 • बिरदेव तरुण मंडळ हलकर्णी
 • भिमगर्जना तरुण मंडळ हलकर्णी

वित्तिय संस्था :
ग्रामीण जनतेला बचतीची सवय लागावी व गरजू लोकांना कमी व्याजदरात कर्जपुरवठा व्हावा यासाठी गावामध्ये पतसंस्थांची उभारणी केली आहे. या वित्तिय संस्थांमुळे गावाचा आर्थिक विकास घडून येण्यास मदत होते .

वित्तिय संस्थाचे नाव :

 • रामलिंग पतसंस्था हलकर्णी
 • बालाजी पतसंस्था हलकर्णी
 • शांतादेवी हत्तरकी पतसंस्था हलकर्णी
 • किसान पतसंस्था हलकर्णी
 • रामलिंग विकास सोसायटी
 • जोतिर्लिंग विकास सोसायटी

ADDRESS
Halkarni Grampanchayat
A/p Halkarni Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416506

CONTACTS
Phone : 9503771733
Office : 02327 – 264110